‘क्यों करूं फिकर’ म्युझिक अल्बमचे दिग्दर्शन
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनीने नेहमीच स्वत:च्या कामात काही तरी नवे करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम अभिनयासोबत वैविध्यपूर्ण नृत्य करू शकणाऱ्या निवडक अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. दिशा पाटनीने कमी कालावधीत मोठी फॅन फॉलोइंग मिळविली आहे. अभिनेत्रीने आता स्वत:च्या कारकीर्दीला नवे रुप देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. दिशा पाटनी आता केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर दिग्दर्शिका म्हणूनही ओळखली जाणार आहे.

दिशाने स्वत:च्या कारकीर्दीच्या आलेखात आता मोठी झेप घेतली आहे. तिने 2016 मध्ये ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले हेते. 7 वर्षांच्या आत दिशाने अनेक हिट चित्रपट अन् विशेष नृत्याद्वारे स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली आहे. अभिनेत्री दिशा आता दिग्दर्शिका देखील झाली आहे. अलिकडेच तिने ‘क्यों करें फिकर’चा टीझर जारी केला आहे. हा एक म्युझिक अल्बम असून ज्याची दिग्दर्शिका तसेच मुख्य नायिका तीच आहे. हे पूर्ण गीत 21 ऑगस्ट रोजी प्रदर्शित केले जाणार आहे.
दिशा पाटनी लवकरच पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट ‘कंगुवा’मध्ये दिसून येणार आहे. दिशा पहिल्यांदाच दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्यासोबत झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.









