ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंना नाशिकमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी भररस्त्यात लुटलं. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटय़ांनी हिसकावली. या घटनेवरुन खा. सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यावर निशाणा साधला आहे.
सुळे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गृहखाते निक्रिय असल्याने हि स्थिती उद्भवली असून गुन्हेगार निर्ढावले आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंच्या गळ्यातील चेन चोरटय़ांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. देव त्यांना निरोगी, दिर्घायुष्य देवो. परंतु या घटनेमुळे जर मंत्र्यांचे नातेवाईक देखील सुरक्षित नाहीत हे उघड झाले आहे. त्यांची ही स्थिती तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गॄहखाते निष्क्रिय असल्याने हि स्थिती उद्भवली असून गुन्हेगार निर्ढावले आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने त्यांना काही…
— Supriya Sule (@supriya_sule) August 20, 2023
माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, आपण कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत गांभीर्याने कार्यवाही करावी”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्वीटद्वारे केली.