सावंतवाडी : प्रतिनिधी
तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांचे मत
आडाळी एमआयडीसी ही दोडामार्ग बरोबर सावंतवाडीला नव संजीवनी देणारी औद्योगिक वसाहत ठरणार आहे. मात्र या वसाहतीचा विकास थांबलेला आहे . म्हणून या भागातील सरपंच भूमिपुत्र आपल्या मागण्यांकरिता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत . याकडे येथील लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. सुदैवाने आपल्या जिल्ह्यातील नेते मंडळी केंद्रात राज्यात सत्तेवर आहेत तसेच जबाबदार मंत्रीपदावरही आहेत. मग हा विकास करायचा झाल्यास सर्व नेत्यांनी एकत्र येऊन या एमआयडीसीचा विकास करण्याचे धाडस दाखवल्यास त्यांच्याकडून हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. केंद्रामध्ये नारायण राणेंसारखं वजनदार नेतृत्व आहे. तर या भागाचे आमदार केसरकर हे मंत्री आहेत. तर या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण आहेत. त्यांनी या एमआयडीसीचा विकास करण्याचा ठरविल्यास मार्ग नक्की निघेल परंतु या नेत्यांनी एक दिलाने मनापासून या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे. असे मत तळकट चे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी व्यक्त केले .









