वार्ताहर कुडाळ
तेंडोली-मुणनकरवाडी येथील रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या खड्यात पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. यातून पादचारी नागरीक व वाहन धारकांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आज तेथील ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान करीत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले.
संबंधीत विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र राऊळ,आकाश मुणनकर संतोष पारकर, तुकाराम मुणनकर, प्रकाश मुणनकर,विजय मुणनकर, सुभाष मुणनकर,वासूदेव मुणनकर, सुरेश प्रभू, शशिकांत आरोलकर आदी ग्रामस्थांनी श्रमदान केले.









