मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे निर्देश
वृत्तसंस्था/ अररिया
बिहारच्या अररिया येथे शुक्रवारी सकाळी एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पहाटे साडेपाच वाजता पत्रकाराच्या घरी चार जण पोहोचले होते. या गुंडांनी पत्रकाराच्या घराचा दरवाजा ठोठावला होता, पत्रकाराने दरवाजा उघडताच या गुंडांकडून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पत्रकार विमल यादव यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेला दुर्दैवी ठरविले आहे. या प्रकरणी लवकरच कारवाई दिसून येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मृत विमल यादव यांचे बंधू गप्पू यादव यांची 5 वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी विमल यादव हे सोमवारी न्यायालयात साक्ष देणार होते. विमल यादव यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले जात आहे.









