दिवसातून तीनवेळा खाण्याच्या परंपरेला आता आव्हान मिळू लागले आहे. कारण देशात खादाडांची नवी पिढी सामान्य आहाराऐवजी स्नॅक्सचा पर्याय निवडत आहे. म्हणजेच तरुणाई आता हेवी ब्रेकफास्टवर निर्भर होत आहे. याला स्नॅकिफिकेशन म्हटले जाते, अधिकाधिक युवा याला खाण्याची आदर्श पद्धती म्हणून अवलंबित आहेत.

हा प्रकार व्यावसायिक अन् कुटुंब दोघांच्याही आधुनिक व्यग्र जीवनशैलीत अधिक सुसंगत ठरतो. मार्केट इंटेलिजेन्स एजेन्सी मिंटेल रिपोर्ट्सच्या अध्ययनातून हा खुलासा झाला आहे. जेन झेड (9-24 वयोगट) आरोग्यदायी आहार इच्छित नाही असे नाही, परंतु त्यांचा उद्देश आणि आहारादरम्यान मोठे अंतर असून ते त्यांना स्नॅक्सवर निर्भर करत आहे. अध्ययनानुसार अधिक आहाराची वृत्ती या वयोगटात सर्वाधिक आहे. याचमुळे देशाचा ब्रेकफास्ट बिझनेस बदलत आहे. कंपन्या देखील या युवा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या उत्पादनांना पुनर्प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत.
स्नॅकिंग सेक्टरचा वाढीव दर
बहुतांश कंपन्यांनी यापूर्वीच स्वत:च्या प्रॉडक्ट पोर्टफोलियोमध्ये बदल केला आहे किंवा बदल करत आहेत. देशाचे स्नॅकिंग सेक्टर 2022-26 दरम्यान 7 टक्क्यांहून अधिक दराने वाढणार असल्याचा अनुमान अध्ययनात व्यक्त करण्यात आला आहे. या वृद्धीचा महत्त्वाचा घटक जेन झेड असल्याचे पुरेसे संकेत मिळाले आहेत. ज्या कंपन्यांचा जेन झेड खरेदीदारांसोबत अधिक संपर्क नव्हता, त्यांना देखील यात सुधारणा करणे भाग पडले आहे. अनेक कंपन्यांनी आता रेडी टू ईट उत्पादनांवर भर देण्यास सुरुवात केली जात आहे. युवा पिढीत पाककौशल्य कमी होत असल्याने रेडी टू ईट पर्यायांना प्राथमिकता दिली जाते. ब्रँड आता उत्तम खानपानाला महत्त्व देतात, जे स्वाद अन् आरोग्याला संतुलित राखतात असे तज्ञांकडून सांगण्यात आले.

आगामी काळात ब्रेकफास्ट बिझनेसमध्ये महत्त्वाचा बदल होणार आहे, कारण मोठ्या संख्येत जेन झेड वर्कफोर्समध्ये जोडली जाणार आहे. कामाचा भार आणि व्यग्र जीवनशैलीमुळे वेळ वाचविणाऱ्या सुविधाजनक स्नॅक्सचा तो शोध घेतील असे मिंटेलच्या वरिष्ठ विश्लेषक तुलसी जोशी यांनी म्हटले आहे.
फास्ट फूडच पहिली पसंत
मिंटेलच्या अध्ययनानुसार मागील एक महिन्यातील खानपानावर नजर टाकल्यास 60 टक्sक जेन झेडने दिवसातून एक किंवा त्याहून अधिक वेळा स्नॅक्स खाल्ले आहेत. तर त्यांच्या खरेदीच्या सवयींचे विश्लेषण केल्यावर 35 टक्के युवा अनेकदा हेल्दी
स्नॅक्स सारख्या सॅलड इत्यादीला प्राथमिकता देत असल्याचे आढळून आले. तर 25 टक्के जण कधीकधी तर 18 टक्के जण नेहमीच हेल्दी स्नॅक्सची निवड करतात. तर 11 टक्के लोक कधीच याविषयी विचार करत नाहीत. या 35 टक्क्यांपैकी एक तृतीयांश जणांनी आरोग्यदायी स्नॅक्स पर्याय निवडण्यास सुरुवात होत असली तरीही चिप्स अन् फ्राइज यासारख्या फास्ट फूडसोबत हा शोध संपत असल्याचे सांगितले आहे.









