पायांना ठोकण्यात आले होते कुलूप
पोलंडमध्ये पुरातत्व तज्ञांनी एक चकित करणारा शोध लावला आहे. त्यांना येथील एका गावात एका मुलाच्या 400 वर्षे जुन्या सांगाड्याचे अवशेष मिळाले आहेत. या मुलाला भयावह पद्धतीने दफन करण्यात आले होते, त्याचे तोंड अजबप्रकारे वळविण्यात आले होते. तसेच या मुलाच्या पायांना लोखंडी कुलुपाद्वारे बांधून ठेवण्यात आले होते. हा सांगाडा पाहिल्यावर पुरातत्व तज्ञ देखील दंग झाले आहेत.

कथितपणे तेथील ग्रामस्थांनी या मुलाला ‘वॅम्पायर चाइल्ड’ संबोधिले आहे. लोकांची भीती दूर करण्यासाठी मृताच्या आत्म्याला कब्रमधून बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी अशाप्रकारचे दफन करण्याची प्रथा होती असे त्यांचे सांगणे आहे. निकोलस कोपर्निकस युनिव्हर्सिटीच्या पुरातत्व पथकाला पोलंडच्या पिएन गावात मुलाचा सांगाडा एका उत्खननस्थळी सापडला आहे. याचठिकाणी 30 अन्य अवशेषही आढळून आले आहेत. संबंधित मुलाचे वय 5-7 वर्षांदरम्यान होते असे एंथ्रोपोलॉजिस्ट्सचे मानणे आहे.
पुरातत्व तज्ञांना नेक्रोपोलिसच्या आत एका अज्ञात कब्रमध्ये अवशेष मिळाले. हा शब्द ग्रीक भाषेतील असून याचा अर्थ ‘मृतांचे शहर’ असा होतो. याच ठिकाणी मागील वर्षी ‘वॅम्पायर वुमन’चे अवशेष आढळून आले होते. या महिलेच्या पायांना देखील कुलूप ठोकण्यात आले होते.









