नवी दिल्ली :
पियाजीयो व्हेईकल्स यांनी भारतात त्यांच्या लोकप्रिय व्हेस्पा स्कूटरची जस्टीन बीबर एक्स आवृत्ती सादर केली आहे. इटालियन ऑटो ग्रुप पियाजीयोच्या भारतीय उपकंपनीने याची किंमत 6.45 लाख रुपये एक्स शोरुम ठेवली आहे.
भारतीय बाजारपेठेतील 150 सीसी सेगमेंटमधील यामाहा अरोक्स 155 आणि अॅप्रिला एसएक्सआर 160 या स्कूटरशी ती स्पर्धा करणार आहे. अरोक्स 155 ची किमत ही 1.42 लाख रुपये आणि अरोक्सची किंमत ही 1.44 लाख रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
भारतात 10 पेक्षा कमी युनिट्स विक्री
स्कूटर फक्त मर्यादित संख्येत भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. म्हणजेच फक्त 10 पेक्षा कमी स्कूटरची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती आहे. संपूर्णपणे बिल्ड युनिट म्हणून प्री ऑर्डर केल्यानंतर भारतात आयात करण्यात येणार असून खरेदीदारांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा भारतातील सर्व व्हेस्पा डीलरशीपवर या स्कूटरचे प्री बुक करण्याची सुविधा राहणार आहे.
व्हेस्पा जस्टिन बीबर एक्स संस्कार
कंपनीचे म्हणणे आहे की, एक्स व्हेस्पा आवृत्ती कॅनेडियन पॉप स्टार जस्टिर बीबरने डिझाइन केले आहे. कंपनीने मागील वर्षातील एप्रिलमध्ये जस्टिन बीबरसोबत सहकार्याची घोषणा केली होती.









