बंदुका, स्फोटक सामग्री हस्तगत : अल-कायदाशी होता संबंध
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचणाऱ्या एका 17 वर्षीय युवकाला फिलाडेल्फियामध्ये अटक करण्यात आली आहे. हा युवक अल-कायदाशी संबंध बाळगून होता आणि तो एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत होता.
आरोपीकडून टॅक्टिकल इक्विपमेंट, तार, रसायने आणि रिमोट डेटोनेटरप्रमाणे वापरले जाणारे उपकरण हस्तगत झाले आहे. आरोपी या सामग्रीद्वारे विध्वंसक हल्ला करणारे अस्त्र निर्माण करू पाहत होता.
आरोपीने या सामग्रींना जोडून विस्फोटक तयार करण्याचे कामही सुरू केले होते. त्याच्याकडून अनेक बंदुका देखील हस्तगत झाल्या आहेत. एफबीआयच्या जॉइंट टेररिजम टास्क फोर्समुळे फिलाडेल्फियामध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. हा हल्ला एका विकृत विचारसरणीच्या नावाखाली करण्यात येणार होता असे फिलाडेल्फियाचे डिस्ट्रिक्ट अॅटर्नी लॅरी क्रॅसनर यांनी सांगितले आहे.
संबंधित युवकाचे कटिबात-अल-तव्हीद-वल-जिहाद (केटीजे) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर त्याच्या विरोधात चौकशी सुरू झाली होती. एफबीआयने या युवकची ओळख पटवून त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती.
संबंधित युवक दहशतवादी कृत्यांमध्ये सामील असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याच्या घरी जात त्याला अटक करून झडती घेतली आहे. युवकाच्या विरोधात सामूहिक विध्वंसाची शस्त्रास्त्रs बाळगणे, कट रचणे, शहरात दहशत फैलावण्याचा प्रयत्न करणे आणि इतरांचा जीव धोक्यात टाकण्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.









