रेटिंग एजन्सी आयसीआरएच्या अहवालामधून अंदाज
नवी दिल्ली :
चालू आर्थिक वर्षात (2023-24) दूरसंचार सेवा उद्योगाच्या महसुलात सात ते नऊ टक्के वाढ अपेक्षित आहे. रेटिंग एजन्सी आयसीआरए यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळी आयसीआरएने म्हटले आहे की नजीकच्या भविष्यात टॅरिफ दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाही, ज्यामुळे दूरसंचार कंपन्यांची प्रति ग्राहक सरासरी कमाई स्थिर राहणार असल्याचेही म्हटले आहे.
यासोबतच आयसीआरएने सांगितले की 5जी नेटवर्क स्थापीत करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायबर बसवावे लागेल. या कारणास्तव कालावधीत दूरसंचार कंपन्यांचा खर्च वाढेल. दूरसंचार कंपन्यांचे कर्ज मार्च 2024 मध्ये 6.1 ते 6.2 लाख कोटी रुपयांच्या उच्च पातळीवर राहील. 31 मार्च 2023 मध्ये ते 6.3 लाख कोटी रुपये होते.









