मेष : प्रॉपर्टीच्या संदर्भात किंवा जमीन घेण्याचा विचार करत असाल तर, एखाद्या व्यक्तीकडून चांगली सूचना मिळू शकते. राहत्या घरामध्ये काही नवीन वस्तू आणाव्यात किंवा घर रेनोवेट करून घ्यावे, शिस्त लावावी, याकरता प्रयत्न कराल. तब्येतीची काही विशेष तक्रार असणार नाही. आर्थिक बाबतीमध्ये समाधानी असाल. उपाय- लाल गाईला गुळ चारावा
वृषभ : या काळात तुमचे मन जास्तीत जास्त प्रवासाकडे आकर्षित होईल. लहान भावंडांविषयी काहीतरी करावे असे विचार मनात येतील. प्रवास झालाच तर, तो पाण्याच्या ठिकाणी होण्याची शक्मयता जास्त आहे. मुलाखत, लेखन कार्य यासारख्या गोष्टींतून फायदा होऊ शकतो. इंटरनेटवर झालेली ओळख फायदेशीर ठरेल. उपाय – श्रीकृष्णाला लोण्याचा नैवेद्य दाखवावा
मिथुन : कळत नकळत बाहेरील पदार्थ खाल्ल्याने कुपथ्य होऊन आजाराला निमंत्रण देण्यासारखे होईल. बाहेर प्रवास करत असाल तर, आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असेल. कौटुंबिक वाद विवादामध्ये तुमच्या भूमिकेला विरोध होण्याची शक्मयता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांची बोलणी खावी लागतील.उपाय – गोमती चक्र आणि हळकुंड जवळ ठेवावे.
कर्क : तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा गरज असते, तेव्हा वैद्यकीय सल्ला घ्यावाच लागतो. तिकडे दुर्लक्ष करून चालत नाही, हे लक्षात घ्या. कोणताही निर्णय घेताना भावनिक न होता व्यवहाराकडे जास्त लक्ष द्या. लहान, मोठा प्रवास घडण्याची शक्मयता आहे. कुटुंबात महत्त्वाची भूमिका निभावत असतानासुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष होईल. उपाय – सांडपाण्यात निळे फूल टाकावे
सिंह : तुम्हाला वाटते तितकी तुमची तब्येत तुमची साथ देईलच, असे नाही. त्यामुळे पार्टी करताना किंवा इतर ठिकाणी खानपान करताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात एखादा लहानसा कार्यक्रम साजरा कराल. धनप्राप्ती समाधानकारक असेल. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. गुंतवणुकीतून फायदा असेल.उपाय- काजळाचे दान करा.
कन्या : ‘सिर सलामत तो पगडी पचास’ हे तुम्हाला चांगलेच कळले आहे, त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरता शक्मयतो सगळे प्रयत्न कराल. व्यापार धंदा किंवा नोकरीच्या ठिकाणी मन फारसे लागणार नाही आणि त्यामुळे काही मनाविऊद्ध घडू शकते. जमिनीच्या व्यवहारांमध्ये चांगली घटना घडण्याची शक्मयता आहे. उपाय- हळदीचा टिळा लावावा
तूळ : तब्येत थोडी नरम गरम राहील. अपचन, गॅसेस, पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. कुटुंबात तुमच्या मनाप्रमाणे न वागल्याने थोडी चिडचिड होऊ शकते. लेखी व्यवहारात चांगले यश मिळेल. प्रवासाचे सुंदर योग होत आहेत. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळाल्याने बरीच कामे पूर्ण होतील. आनंदी राहाल.उपाय – चांदीचा चौकोन खिशात ठेवा.
वृश्चिक : तब्येतीच्या बाबतीमध्ये अत्यंत सावध राहा. कोणताही प्रकारची रिस्क घेणे महागात पडू शकते. शक्मयतो घरचे खाणे आणि प्रवास टाळणे हे कटाक्षाने पाळा. जे काम करत आहात, त्यामध्ये ओळखीमुळे नवीन प्रोजेक्ट किंवा संधी मिळतील. पूर्वी ज्या व्यक्तीने टाळले, तीच व्यक्ती तुमच्याकडे काम घेऊन येऊ शकते. उपाय- शेंदुरी गणेशाची पूजा करा
धनु : बऱ्याच दिवसानंतर शरीर आणि मन ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल. मूड फ्रेश असेल. नवीन काम करण्यामध्ये रस निर्माण होईल. या काळात पैशापेक्षा समाधान जास्त मिळावे, असे वाटेल. प्रेम संबंधांमध्ये मधुरता येईल. छोट्या-मोठ्या गुंतवणुकीतून चांगल्या प्रकारच्या फायद्याची अपेक्षा करायला हरकत नाही. उपाय- योग्य व्यक्तीला धार्मिक ग्रंथ भेट द्या.
मकर : आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्मयता आहे. जमीन किंवा प्रॉपर्टीच्या देवाणघेवाणीतून फायदा होऊ शकतो. ज्येष्ठ स्त्री व्यक्तीचा सल्ला कामी येईल. मनोरंजन किंवा करमणूक व्हावी, म्हणून समान आवडीच्या लोकांची साथ मिळेल. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. नोकरदार वर्गाने सावध राहावे. उपाय-उडदाचे 11 दाणे जवळ ठेवा
कुंभ : स्वभावामध्ये थोडा विचित्रपणा येण्याची शक्मयता आहे. पण त्यामुळे लोकांशी असलेले नाते बिघडू नये, याची काळजी घ्यावी लागेल. पैसे खर्च झाल्यामुळे थोडा मनस्ताप होऊ शकतो. प्रवास घडेल. घर किंवा जमीन यांच्या माध्यमातून सुखप्राप्ती होईल. वाहन सुख चांगले आहे. रिस्क असलेली इन्व्हेस्टमेंट करू नये. उपाय- गरजूला तेल दान द्या
मीन : तब्येतीकडे दुर्लक्ष करणे, हा तुमचा स्वभाव होऊ नये, याची काळजी घ्या. आपल्या तब्येतीला आपणच जपावे लागेल, दुसरे कोणीही येणार नाही, याचा विचार करा. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. धनप्राप्ती उत्तम असेल. एखाद्या कारणाने प्रवास घडण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीच्या वादामध्ये अजिबात पडू नका. उपाय- चंदनाचा टिळा लावावा.