वार्ताहर /केपे
कुडचडे येथील ‘युवा स्वराज’ या संस्थेकडून काणकोणातील श्रमधाम योजनेसाठी दहा हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे देण्यात आली असून ही मदत सभापती रमेश तवडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल उपस्थित होते. काब्राल म्हणाले की, कला, क्रीडा, संस्कृती, आरोग्य, शिक्षण व इतर क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य संस्थेने केले आहे. याकरिता त्यांचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे कमीच. त्यांनी आपले कार्य असेच चालू ठेवावे, असे त्यांनी पुढे सांगितले. तवडकर म्हणाले की, युवा स्वराज संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून प्रतीक वस्त यांच्या पुढाकाराने संस्था योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. संस्थेने सामाजिक भावनेतून दिलेली ही मदत मौल्यवान आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी युवा स्वराजचे अध्यक्ष प्रतीक वस्त, सचिव रवित नाईक, रजत नाईक, अनिकेत नाईक, वृषभ नाईक, तनुजा वस्त, अंजना नाईक, रतिजा नाईक, सियाली तुळस्कर यांची उपस्थिती होती.









