वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इटलीच्या राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक रॉबर्टो मॅनसिनी यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. इटालियन फुटबॉल फेडरेशनने ही माहिती रविवारी दिली आहे.
2018 पासून इटलीच्या फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून मॅनसिनी कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इटलीने 2020 साली युरो चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडचा पेनल्टीमध्ये पराभव केला होता. 58 वर्षीय मॅनसिनी यांचा राजीनामा इटालियन फुटबॉल फेडरेशनने स्वीकारला असून आता लवकरच नव्या फुटबॉल प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी इटली फुटबॉल फेडरेशनच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.









