वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा नवोदित युवा बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रेनकीरे•ाrने 23 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रात अलीकडच्या कालावधीत विविध अव्वल बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने सातत्याने दर्जेदार कामगिरी करत अजिंक्यपदे मिळवली आहे. रविवारी सात्विक साईराजचा 23 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आशिया सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सात्विकच्या पदक दौऱ्याला प्रारंभ झाला. त्याने चिराग शेट्टी समवेत अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सात्विने चार पदके मिळवली आहेत. 2018 आणि 2022 च्या मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये सात्विकने अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले होते. गेल्या वर्षी झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत सात्विकने चिराग समवेत पुरुष दुहेरीत कास्यपदक मिळवले होते. तर दुबईमध्ये झालेल्या 2023 च्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सात्विकने चिरागसमवेत पुरुष दुहेरीत सुवर्णपदक मिळवले होते.









