वृत्तसंस्था/ टोरँटो (कॅनडा)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स डी मिनॉर आणि इटलीचा जेनिक सिनेर यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिनॉरने स्पेनच्या फोकिनाचा 6-1, 6-3 तर इटलीच्या जेनिक सिनेरने अमेरिकेच्या 12 व्या मानांकित टॉमी पॉलचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत गेल्या शुक्रवारी डी मिनॉरने रशियाच्या द्वितीय मानांकित मेदव्हेदेवला पराभवाचा धक्का दिला होता. मिनॉरने गेल्या मार्च महिन्यात अॅकापुल्को टेनिस स्पर्धा जिंकली असून त्याने आतापर्यंत सहावेळा एटीपी टूरवरील स्पर्धा जिंकल्या आहेत. इटलीच्या सिनेरने आतापर्यंत एटीपी टूरवरील सात स्पर्धा जिंकल्या असून गेल्या फेब्रुवारीत त्याने माँटेपिलेर स्पर्धेत विजेतेपद मिळवले होत