बेळगाव : शाहूनगर अन्नपूर्णावाडी भागातील एका इमारतीत इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची आमदार आसिफ सेठ यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. तसेच जिल्हा प्रशासनाकडून त्यांना दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अंत्यत दुर्दैवी आणि दुःखदायक घटना घडली असून त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहे. सध्या 2 लाख रुपयांची मदत करत आहोत. मुख्यमंत्री मदत निधीतूनही आणखी मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
रामदुर्ग तालुक्यातील आरबेंची तांडा येथून बेळगाव शहरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या इराप्पा राठोड, शांतव्वा रोठोड आणि त्यांची नातअन्नपूर्णा राठोड या तिघांचा एकाचवेळी अंत झाला होता. या घटनेने संपूर्ण शहर हळहळले होते.









