कोल्हापूरात आज IBPS परिक्षेच्या केंद्रावर विद्य़ार्थी आणि पर्यवेक्षक यांच्यात वाद हाऊन चांगलाच गोंधळ माजला.यामुळे केंद्रावर गंभिर वातावरण निर्माण होऊन परिक्षार्थी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
राज्याभरात बँकिंग क्षेत्राशी संबंधीत IBPS परिक्षा पार पडल्या. कोल्हापूरातही अनेक ठिकाणी परिक्षाकेंद्रावर ही परिक्षा संपन्न झाली. कोल्हापूरातही ION केंद्र, शिये या केंद्रावर IBPS क्लर्क परीक्षेत कागदपत्रे नसल्याने विद्यार्थ्यांना काढले बाहेर काढल्याचा प्रकार घडला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तर विद्यार्थ्याकडून चुकीच्या पद्धतीने नियम लावून आम्हाला बाहेर काढण्याचा आरोप परिक्षा पर्यवेक्षनावर केला. याच परिक्षा केंद्रावर काही दिवसांपूर्वी मोबाईल सापडला होता.
एका किरकोळ कारणावरून परीक्षेत बसून दिल्याने विद्यार्थी संतप्त झाले. या घटनेची माहीती मिऴताच ऑल इंडिया युथ फेडरेशन आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी परीक्षा केंद्रावर उपस्थित झाले. त्यावेळी या संघटनेकडून या घटनेचा निषेध व्यक्त करून केंद्रप्रमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली.









