पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हातातून सत्तेची वाळू निसटत आहे. 2024 मध्ये, त्यांची मुठ रिकामी होईल असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्य़ा पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये म्हटले आहे. आपल्या लेखात बोलताना राहूल गांधी यांनी 2024 च्या निवडणूकींचा बिगूल वाजवला असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर आपल्या लेखाच्या माध्यमातून खरपूस टिका केली आहे. ते शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे कार्यकारी संपादक असून त्यांनी रविवारी आपल्या स्तंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हातातून सत्ता निसटत आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधींनी 2024 च्या मतदानाचा बिगुल वाजवला असून नेरंद्र मोदी आणि अमित शहा यांना ‘चले जाव’चा इशारा दिला असल्याचे म्हटले आहे.
या लेखानंतर माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले, “राहुल गांधींना भाजपने अपात्र ठरवल्यानंतर या प्रकरणाला सांभाळणे भाजपला कठीण जात होते. ज्या प्रकारे राहूल गांधी हे संसदेत आणि संसदेबाहेरही देशाचे प्रश्न मांडत होते, त्यामुळे भाजपच्या प्रमुख नेत्यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच त्यांनी पद्धतशीर योजना आखून राहूल गांधी यांची लोकसभेतून वगळण्यात यश मिळवले.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “पण राहुल गांधी यांनी सरकारविरोधातील अविश्वास ठरावादरम्यान लोकसभेत एखाद्या योद्ध्याप्रमाणे प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी एक जबरदस्त भाषण केले. त्यांच्या भाषणाचे संपूर्ण देशाने कौतुक केले असून एक प्रकारे राहुल यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. तसेच त्यांनी मोदी- शाह जोडी आणि संपूर्ण भाजपला ‘चले जाव’चा इशारा दिला आहे”








