शाहूवाडी प्रतिनिधी
शाहुवाडी तालुक्यातील सांबू गावचा युवक प्रज्वल प्रकाश कांबळे वय 22 या तरुणाचा कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावर शुक्रवार दि ११ रोजी रात्री झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मुत्यू झाला. . याची नोंद शाहुवाडी पोलीसात झाली आहे.
पोलीसातुन मिळालेली महिती अशी सांबू येथील युवक प्रज्वल कांबळे हा आपल्या मोटार सायकलवरून मलकापूर कडे येळाणे गावच्या हददीतील कोल्हापूर – रत्नागिरी महामार्ग वरून जात असताना ‘ ट्रकला धडकून मोटार सायकल व टूकचा अपघात झाला . यामध्ये प्रज्वल कांबळे गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना त्याचा मुत्यू झाला.
कष्टकरी गरीब कुटुंबातील एकुलत्या एका मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीयानी फोडलेला हंबरडा हदय पिळवटून टाकत होता . त्याच्या मुत्यूने सांबू गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पाश्चात आई वडील व लहान बहीण असा परिवार आहे .









