प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई सोसायटी कॉलेज ऑफ एज्युकेशनतर्फे जिनिव्हा करार दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला लेफ्टनंट कर्नल विनोदिनी शर्मा उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. पी. पुरी होते.
विनोदिनी शर्मा यांनी जिनिव्हा कराराविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. दुसऱ्यांना मदत करणे हा मानवी स्वभावाचा गुणधर्म असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रेडक्रॉसच्या अधिकारी सुजाता पै उपस्थित होत्या.









