कर्तृत्व आणि जीवनशैली अतुलनीय असलेले डॉ. हॉवर्ड टकर सात दशकांहून अधिक काळ रुग्णांवर उपचार करत आहेत. आज ते 101 वर्षांचे असूनही त्यांची पावले थांबलेली नाहीत. या वयातही ते दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत रुग्णांच्या सेवेत असतात. डॉक्टर टकर हे न्यूरोलॉजिस्ट असून त्यांनी नुकतेच त्यांनी मन कुशाग्र ठेवण्याचा एक मार्ग सांगितला.

डॉ. टकर यांनी आपल्या दीर्घ आयुष्याचे रहस्य सांगितले. मला प्रत्येक क्षण व्यस्त राहायला आवडते. हे माझ्या कामासाठी देखील महत्त्वाचे आहे कारण न्यूरोलॉजीमध्ये दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. त्याचा आढावा अतिशय महत्त्वाचा आहे. रात्रंदिवस रुग्णांमध्ये राहून त्यांच्यावर उपचार करणे हेच त्यांचे ध्येय आणि जीवनाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. कोविडच्या काळात जेव्हा संपूर्ण जग संकटात सापडले असताना वृद्धांना संसर्गाच्या विळख्यात येऊ नये म्हणून त्यांना वाचवले जात होते. त्यानंतरही डॉ. टकर यांना चैन पडली नाही. ते आपल्या रुग्णांवर उपचार करताना दिसत होते. कोविड संसर्गाच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात जाणे सोपे काम नव्हते. एक डॉक्टर म्हणून माझ्या रुग्णांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी असल्यामुळेच मी बिनधास्त होतो असे त्यांनी आत्मविश्वासपूर्ण भाषेत सांगितले.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील क्लीव्हलँडमध्ये जन्मलेले डॉक्टर टकर हे केवळ वैद्यकीय सेवेपुरते मर्यादित नाहीत. वयाच्या 60 व्या वषी त्यांनी ओहायो बारची परीक्षा उत्तीर्ण केली आणि नंतर लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ते सतत संशोधन करत असतात. विशेषत: न्यूरोलॉजीबद्दल वेगवेगळे पैलू जाणून घेण्यात ते दंग राहताना आपला मेंदू व्यस्त ठेवतात. त्यांचे सामाजिक जीवनही अप्रतिम आहे. माझी पत्नी आणि मी अनेकदा सारासोबत शेजारी आणि मित्रांसोबत जेवायला जातो. सारा 89 वर्षांची आहे आणि ती एक मानसोपचार तज्ञदेखील असल्याचे डॉ. टकर यांनी सांगितले. डॉ. टकर यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सर्वात वयोवृद्ध डॉक्टर म्हणून सन्मानित केले आहे.
निरोगी जीवन जगण्यासाठी सामाजिक असणे आवश्यक आहे. मजबूत सामाजिक संबंध असलेले लोक दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगतात. दुर्दैवाने माझे अनेक जवळचे मित्र, कुटुंबातील सदस्य आणि सहकारी माझ्यापूर्वी गेले. पण मी नशीबवान आहे की मला आजवर काहीही झाले नाही. आठवड्यातून किमान दोनदा आम्ही आमची मुलगी, तिचा नवरा, आमचा मुलगा आणि त्याची बायको यांच्यासोबत बाहेर जेवायला जातो. आम्ही मित्र आणि सहकाऱ्यांसोबत नवीन रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आनंद घेतो. यामुळे मानसिक आरोग्य सुधारते, असा त्यांचा दावा आहे.









