एनआयक्यूच्या अहवालामधून माहिती सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ग्रामीण भागातील एफएमसीजी व्यवसायाने चांगली वाढ नोंदवली आहे. एफएमसीजी क्षेत्रासाठी एनआयक्यू (पूर्वीचे निल्सन आयक्यू) यांनी एप्रिल-जून तिमाही अहवालात म्हटले आहे की तिमाहीत ग्रामीण बाजारातील एफएमसीजी क्षेत्राची वाढ 4 टक्के होती. या आधीच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी-मार्चमध्ये 0.3 टक्क्यांनी वाढ झाली होती. दुसऱ्या तिमाहीत विक्रीत 7.5 टक्के वाढ झाली असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार, एफएमसीजी उद्योग 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत मूल्याच्या दृष्टीने 12.2 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत. 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत, विक्री 7.5 टक्क्यांनी वाढली, जी गेल्या 8 तिमाहीत पाहता सर्वाधिक आहे.
एनआयक्यू इंडियाचे रुझवेल्ट डिसोझा (कस्टमर सक्सेस) म्हणाले, 2023 मधील कामागिरी ही जवळपास दीड वर्षातील सर्वोत्कृष्ट तिमाही ठरली आहे आणि सर्व श्रेणींमध्ये चांगली वाढ झाली आहे. बिगरखाद्य उत्पादनांच्या मागणीत ग्रामीण बाजारपेठांमध्येही वाढ झाली आहे, जी गेल्या काही तिमाहीत घसरत होती.
शहरी बाजारपेठेत सतत वापर वाढता
दरम्यान, शहरी बाजारपेठेत खप सातत्याने वाढत आहे. एप्रिल-जून तिमाहीत तो 10.2 टक्क्यांनी वाढला, तर वर्षापूर्वीचा आकडा केवळ 5.3 टक्के होता. देशाबद्दल बोलायचे झाले तर या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत खाद्यपदार्थांचा वापर 4.3 टक्क्यांनी कमी झाला आहे.
ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी म्हणाले की, प्रादेशिक कंपन्यांमधील स्पर्धा पूर्वीपेक्षा जास्त आहे. ते म्हणाले, ‘आम्ही हे यापूर्वीही पाहिले आहे. जेव्हा महागाई जास्त राहते तेव्हा स्थानिक कंपन्या बाजूला होतात आणि जेव्हा परिस्थिती सामान्य होते तेव्हा स्थानिक कंपन्या बाजारात प्रवेश करतात. ते ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी मोठ्या योजना आणतात, ज्याचा त्यांना फायदा होतो असेही ते म्हणाले आहेत.









