Sangli News : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी सांगली तर्फे दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज (दि -१०)रोजी खरे सांस्कृतिक भवन विश्रामबाग सांगली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेखर जोशी सहयोगी संपादक सकाळ, मंगेश मंत्री संपादक तरुण भारत उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षानी प्रसिद्ध उद्योजक मनोहर सारडा उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी सांगलीचे विभागीय व्यवस्थापक सुदत पाठक यांनी प्रास्ताविक आणि लोकमान्यच्या कार्याची माहिती दिली.यावेळी सांगली परिसरातील वीस शाळांमधील ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना शेखर जोशी,मंगेश मंत्री आणि मनोहर सारडा यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता वाडकर यांनी तर आभार असिस्टंट रिजनल मॅनेजर प्रदीप पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला मॅनेजर सुभाष मोरे,मॅनेजर ऑडिट सतिश मेहता,रिलेशनशीप मॅनेजर श्रीधर जोग, मार्केटिंग मॅनेजर सुरज पाटील सर्व शाखांचे व्यवस्थापक आणि कर्मचारी उपस्थित होते.