गुंतवणूकदारांना 14 पर्यंत अर्ज करण्याची संधी
वृत्तसंस्था /मुंबई
‘टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स’ या एकात्मिक सप्लाय चेन सोल्युशन्स प्रदान करणाऱ्या कंपनीचा आयपीओ गुरुवारी सार्वजनिक सबक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. कंपनीला या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाद्वारे म्हणजेच आयपीओद्वारे 600 कोटी रुपये उभे करायचे असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. किरकोळ गुंतवणूकदार आजपासून 14 ऑगस्टपर्यंत या आयपीओसाठी बोली लावू शकतील. कंपनीचे समभाग हे 23 ऑगस्ट रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) वर सूचीबद्ध केले जातील. कंपनी लवकरच आयपीओची किमत ठरवणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी पुढील 1-2 दिवसात प्राइस बँड जारी करेल. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के हिस्सा राखीव व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 75 टक्के इश्यू कंपनीने राखून ठेवला आहे.
एफएमसीजी-ऑटोमोटिव्हसह इतर उद्योगांमध्ये व्यवसाय
टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स 25 देशांमध्ये व्यवसाय करते. कंपनीकडे 4 व्यवसाय आहेत, ज्यात सप्लाय चेन सोल्युशन्स, मॅन्युपॅक्चरिंग, ऑटो डीलरशिप आणि आफ्टरमार्केट सेल्स अँड सर्व्हिसचा समावेश आहे.









