मणिपूरच्या 40 आमदारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र : लुटलेली शस्त्रास्त्रs परत मिळविण्यात यावीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मणिपूरच्या 40 आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असून यात त्यांनी स्वत:च्या 6 मागण्या मांडल्या आहेत. यात मणिपूरमध्ये एनआरसी लागू करणे, उग्रवाद्यांकडून शस्त्रास्त्रs परत मिळविणे व शांतता चर्चेच्या पुढाकाराचा मुद्दा सामील आहे. तर दुसरीकडे विशेष विधानसभा अधिवेशनाच्या मागणीवरून शेकडो महिलांनी बुधवारी रात्री इंफाळच्या कीसंपत, कीसमथोंग व क्वाकीथेल व इंफाळ पूर्व जिल्ह्यातील वांगखेई तसेच कोंगबामध्ये मशाल फेरी काढली आहे. याचबरोबर स्थानिक पोलीस आणि आसाम रायफल्स मणिपूरमध्ये आमने-सामने आले आहेत. दोन्ही दलांमधील तणाव वाढला आहे. दोन्ही दलांमधील वादावादीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
उग्रवाद्यांकडून शस्त्रs परत मिळवा
सुरक्षा दलांना तैनात करणे पुरेसे नसून हिंसा रोखण्यासाठी समाजकंटकांकडून शस्त्रास्त्रs परत मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर समाजकंटकांकडून गोळीबार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अत्याधुनिक स्नायपर रायफल आणि रॉकेट ग्रेनेडचा वापर झाला आहे. अशाप्रकारच्या या घटना केंद्रीय सुरक्षा दलांच्या उपस्थितीत झाल्या आहेत. यामुळे लोकांचा त्यांच्यावरील भरवसा कमी झाला असून संताप वाढला आहे. आसाम रायफल्सला हटवून त्यांच्या जागी राज्य तसेच केंद्रीय दलाला तैनात करण्यात यावे अशी मागणी आमदारांनी पत्राद्वारे केली आहे.
सस्पेन्शन ऑफ ऑपरेशनची वापसी
30 कुकी समुदायाच्या 25 समुहांसोबत 2008 मध्ये झालेल्या सस्पेंशन ऑफ ऑपरेशनचा करार मागे घेण्यात यावा, कारण तेथे नियमांचे उल्लंघन झाले आहे. राज्यात शस्त्रास्त्रs आणि दारूगोळ्यासमवेत मोठ्या प्रमाणावर विदेशी घुसखोरी झाली आहे. त्यांचे स्रोत अन् फंडिंगची चौकशी करण्यात यावी. मागील तीन महिन्यांपासून संघर्ष कशाप्रकारे सुरू आहे आणि शस्त्रास्त्रs कुठून येत आहेत हे शोधून काढण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.
एनआरसी लागू करा
संघर्ष रोखण्यासाठी अनेक पर्याय असून यात मणिपूरच्या मूळ रहिवाशांसाठी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लवकर लागू करणे सामील आहे. स्थलांतरितांसाठी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले असून त्याला बळ देण्यात यावे अशी मागणी 40 आमदारांनी केली आहे.
स्वतंत्र प्रशासन नको
आयटीएलएफ/कुकी समुदायाच्या मागणीनुसार राज्यात स्वतंत्र प्रशासन कुठल्याही स्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे 40 आमदारांनी स्वत:च्या पत्रात नमूद पेले आहे. सर्व समुदायांना विश्वास मिळवून देण्यासाठी ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिलला मजबुती द्यावी. हिल एरिया कमिटी आणि 6 एडीसीसाठी नियमित निवडणुकीवर विचार केला जाऊ शकतो असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शांतता चर्चेचा पुढाकार
इतर मागण्यांची पूर्तता झाल्यावर आवश्यक शांतता चर्चा सुरू केली जाऊ शकते आणि सुरू असलेल्या संकटावर स्थायी तोडगा काढला जाऊ शकतो असे या आमदारांनी पत्राद्वारे सुचविले आहे.
आसाम रायफल्सला हटविले
राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी विष्णुपूर जिल्ह्यातील मोइरंग लमखाई चेकपॉइंटवरून आसाम रायफल्सला हटवून त्याच्या जागी पोलीस तसेच सीआरपीएफला तैनात केले आहे. हे पाऊल मैतेई महिलांची संघटना मेइरा पाइबीसकडून आसाम रायफल्सला हटविण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आल्यावर उचलण्यात आले आहे. आसाम रायफल्स कुकी समुदायाची बाजू घेत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. मैतेई समुदायाच्या मागणीला मणिपूरमधील भाजप आमदाराचेही समर्थन मिळत आहे.









