न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला एफबीआयने चकमकीत कंठस्नान घातले आहे. अध्यक्ष पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उटाह प्रांतात जाणार होते, त्यापूर्वीच एफबीआयने ही कारवाई केली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये उटाह येथील रॉबर्टसनने बिडेन अन् उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी रॉबर्टसनला उटाह येथील सॉल्ट लेक सिटीमध्ये बुधवारी त्याच्या घरी सर्च वॉरंट आणि अटक वॉरंट देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलीस तेथे पोहोचल्यावर रॉबर्टसनने त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. यामुळे एफबीआयने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत रॉबर्टसनला कंठस्नान घातले आहे. एफबीआयने रॉबर्टसनसोबतच्या चकमकीची माहिती अध्यक्ष बिडेन यांना दिली आहे. रॉबर्टसनकडे अनेक धोकादायक शस्त्रास्त्रs होती, यात अनेक प्रकारच्या स्नायपर रायफल्स देखील सामील आहेत. रॉबर्टसनवर अध्यक्ष बिडेन अन् उपाध्यक्ष हॅरिस यांना धमकी देण्यासह आणखी दोन गुन्हे नोंद होते. बिडेन यांच्या उटाह दौऱ्यापूर्वी रॉबर्टसनने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. एम24 स्नायपर रायफलवरील धूळ हटविली असल्याचे त्याने यात नमूद पेले होते. तर अध्यक्षांच्या हत्येसाठी ही अत्यंत योग्य वेळ असल्याचे त्याने मागील पोस्टमध्ये लिहिले होते. रॉबर्टसन हा डोनाल्ड ट्रम्प यांचा कट्टर समर्थक होता. ट्रम्प यांच्या निवडणुकीतील पराभवाचा सूड उगविणार असल्याचे तो सांगत होता.
Previous Article‘ताली’चा ट्रेलर प्रदर्शित
Next Article विदेशी फंडिंग, शस्त्रपुरवठा, घुसखोरीची चौकशी व्हावी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









