टिळकवाडी भागात चिखल अन् ख•dयांचे साम्राज्य : तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी
बेळगाव : ग्रामीण भागापेक्षाही बिकट अवस्था शहरातील रस्त्यांची झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या टिळकवाडी येथील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून ये-जा करताना गैरसोय होत आहे. शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या या परिसरात रस्त्यांची दैना झाल्याने याला कोणी वाली आहे की नाही? असा संतप्त सवाल रहिवाशांतून विचारला जात आहे. टिळकवाडीतील आगरकर रोड, रानडे रोड, रॉय रोड, सावरकर रोड, लेले ग्राऊंड परिसरात रस्ते चिखलमय झाले आहेत. भूमिगत वीजवाहिन्या, जलवाहिन्या व इतर केबल्स घालण्यासाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे रस्त्यांमध्ये ख•s पडले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून झालेल्या पावसामुळे सर्वत्र दलदल निर्माण झाली असून वाहने चालविणेही कठीण बनले आहे. या दलदलीमुळे दुचाकीचालकांचे अपघात घडत आहेत. रात्रीच्यावेळी ख•dयांचा अंदाज न आल्याने वाहनचालक घसरून पडत आहेत.
रस्त्यांच्या दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
टिळकवाडी परिसरात अनेक उच्चभ्रू व्यक्ती रहात असतानाही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात जर ही अवस्था असेल तर उपनगरांमध्ये काय भयावह परिस्थिती असेल, याचा विचार न केलेलाच बरा, असे म्हणण्याची वेळ बेळगावमधील नागरिकांवर आली आहे. सर्वत्र ख•sमय रस्ते असल्यामुळे वाहनचालकांच्या पाठ आणि कंबरेच्या दुखण्यांमध्ये वाढ झाली आहे.
गल्लीबोळांत खोदाईचे सत्र
जलवाहिन्या घालण्यासाठी टिळकवाडीमधील अंतर्गत बोळांमध्ये खोदाई करण्यात आली आहे. बऱ्याच ठिकाणी चरी मारण्यात आल्या. त्यातील चिखल वाहात येऊन मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचला आहे. चरी वेळेवर बुजविल्या नसल्याने त्यामध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशीही मागणी होत आहे.









