वार्ताहर /उचगाव
उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मुलांच्या कब•ाr संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तर मुलींच्या खो-खो संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. या क्रीडा स्पर्धांचे यजमानपद बेकीनकेरे येथील नागनाथ हायस्कूलकडे होते. उचगाव विभागातील 13 हायस्कूलनी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या कब•ाr संघाने चांगल्याप्रकारे खेळ खेळून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला होता. नागनाथ हायस्कूल बेकिनकेरे व स्वामी विवेकानंद हायस्कूल उचगाव यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. यामध्ये स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या कब•ाr संघाने उत्कृष्ट चढाई व पकड करून दहा गुणांनी हा सामना जिंकला. तर मुलींच्या खो-खो संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. वैयक्तिक खेळामध्ये सर्व मुला-मुलींनी विशेष प्राविण्य मिळविले. रिले प्रथम संध्या बेर्डे, समीक्षा बेनके, सलोनी रुटकुटे, मिताली कोवाडकर तर 400 मीटर धावणे प्रथम रिया हांडे, पंधराशे मीटर धावणे द्वितीय समीक्षा बेनके, 800 मीटर धावणे अश्विनी पावशे प्रथम, सलोनी रुटकुटे द्वितीय, चालणेमध्ये मिताली कोवाडकर प्रथम क्रमांक मिळविला.
मुलांचा गट
उंच उडी तुषार कुंभार प्रथम, लांब उडी तुषार कुंभार प्रथम, 3000 मीटर धावणे तुषार कुंभार तृतीय, भालाफेक लोकेश डोनकरी तृतीय आदी विद्यार्थी विद्यार्थिनीनी यश संपादन केले. या खेळाडूंचा क्रीडाशिक्षक एस. आर. भोगुलकर, एस. ए. मिलके, पी. एल. सोमनाथ, ए. डी. पाटील, विनायक एल. झगरुचे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.









