वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचा क्रीडामंत्री व क्रिकेटपटू मनोज तिवारीने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. तो यापुढे देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळणार आहे. त्याने आपल्या निर्णयातला बदल बंगाल क्रिकेट असोशिएनचा अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांच्या सांगण्यावरुन केला आहे. ‘गेल्या मोसमात बंगालचे कर्णधारपद भूषवून अंतिम फेरी गाठणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. बंगाल संघाचे नेतृत्व ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 2019 व 2022 मध्ये आम्ही रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचलो होतो. आता, शेवटचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे तिवारीने सांगितले.









