कर्तव्यावर असताना लष्करी वाहनाला दुर्घटना
► वृत्तसंस्था/ गंगटोक
पूर्व सिक्कीममध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना दोन जवान हुतात्मा झाले आहेत. हवालदार एस मैती आणि नाईक किशोर पारवे अशी या जवानांची नावे आहेत. मंगळवारी, 8 ऑगस्ट संध्याकाळी रोजी देशाच्या ईशान्येकडील सिक्कीम राज्यात झालेल्या एका अपघातात लष्कराच्या दोन जवानांना प्राण गमवावे लागल्याची माहिती लष्कराने निवेदनाद्वारे जारी केली आहे. तथापि, त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्टपणे समजू शकले नाही. ऑपरेशनल ड्युटीदरम्यान दोन्ही लष्करी जवानांचा वाहन चालवताना मृत्यू झाल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. सिक्कीममध्ये अपघातात दोन जवान हुतात्मा









