कॉल मी बे या सीरिजमध्ये भूमिका
अभिनेता वीर दास धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत निर्मित वेबसीरिज ‘कॉल मी बे’मध्ये अभिनेत्री अनन्या पांडे आणि गुरफतेह पीरजादासोबत दिसून येणार आहे. ही सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.

या सीरिजमध्ये अनन्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये अनन्या एका अब्जाधीश फॅशनिस्टाची भूमिका साकारत आहे. अनन्या या सीरिजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. तर वीर दास देखील यात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे.
एका युवतीला स्वत:च्या सेफ झोनमधून बाहेर पडत स्वतंत्र स्वरुपात राहणे भाग पाडते. स्वत:बद्दलचे पूर्वग्रह दूर सारून जगात स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या युवतीची भूमिका अनन्या साकारणार आहे. या सीरिजद्वारे आधुनिक नातेसंबंधांच्या भावनांना वेगळ्या दृष्टीकोनातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सीरिजचे दिग्दर्शन कोलिन डी कुन्हा यांनी केले आहे.
कॉल मी बे या सीरिजचे चित्रिकरण पूर्ण झाले असून लवकरच याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाऊ शकते. अनन्या यापूर्वी लायगर या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत दिसून आली होती. सध्या ती स्वत:चा आगामी चित्रपट ड्रीम गर्ल 2 चे प्रमोशन करत आहे.









