वाहन बाळगण्यसाठी घ्यावी लागते अनुमती
जगात अशी अनेक शहरे आहेत, ज्यांचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी सरकारपासून सर्वसामान्य जनता देखील अनेक प्रकारच्या उपाययोजना करत असते. सरकारकडून लागू केल्या जाणाऱ्या नियमांमुळे लोकांना त्रास होत असतो, परंतु स्वत:च्या शहराचे सौंदर्य जपण्यासाठी लोक त्यांचे कसोशीने पालन करत असतात. सध्या स्वीत्झर्लंडमधील जरमॅट शहर याच कारणामुळे चर्चेत आहे. या शहरात कुणीही वाहन बाळगू शकत नसल्याचा नियम सरकारने लागू केला आहे. यामुळे या शहरात कुणीही कारमधून प्रवेश करू शकत नाही. अशा स्थितीत या शहरात प्रवास करण्यासाठी लोकांकडे केवळ एकच पर्याय शिल्लक राहिला आहे.
स्वीत्झर्लंडने जरमॅटमध्ये खासगी कार बाळगण्याचा अधिकार लोकांकडून काढून घेतला आहे. येथील पालिकेने पेट्रोल-इंधनयुक्त वाहनांवरही बंदी घातली आहे. याचबरोबर शहरात राहणारे अन् वाहनांची गरज असलेल्यांना विशेष परवान्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा परवाना मिळाल्यास त्यांना क्षेत्रात निर्मिती छोटी कार उपलब्ध केली जाणार आहे.
जरमॅटला पूर्वी अत्यंत दुर्गम मानले जात होते. या शहरातील लोकांची रस्त्यांवर वाहने धावू नयेत अशी इच्छा आहे. याऐवजी या लोकांनी सार्वजनिक परिवहन, पायी चालण्याचा मार्ग अधिक श्रेयस्कर मानला आहे. केवळ एक अरुंद अन् वळणावळणाच्या रस्त्याद्वारेच कार शहराच्या सीमेत ये-जा करू शकते, परंतु याकरता संबंधित लोकांना मोठे शुल्क भरावे लागणार आहे. याचमुळे लोकांकडे आता सार्वजनिक वाहतूक सेवा हाच एकमेव पर्याय शिल्लक राहणार आहे. बहुतांश लोक शहर अन् परिसरात ये-जा करण्यासाठी रेल्वेसेवेवर निर्भर आहेत.
सरकारकडून मिळवावा लागणार परवाना
विशेष आवश्यकता असलेल्या लोकांकडे आता वाहन असू शकणार आहे. परंतु बिल्डर अन् टॅक्सीचालकांना वाहनांप्रकरणी काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तरीही ज्या लोकांना वाहनाची आवश्यकता आहे, त्यांना शासकीय परवान्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा परवाना अत्यंत विशेष कारणासाठीच मंजूर केला जाणार आहे. तसेच सरकार विशेष डिझाइनची कार लोकांना देणार आहे. अशाप्रकारे शहर प्रदूषणापासून मुक्त राहणार आहे.









