नवी दिल्ली
प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीच्या चिफ फायनान्शियल ऑफिसर अर्थात सीएफओपदी वैभव तनेजा यांची निवड करण्यात आली आहे. वैभव तनेजा हे भारतीय वंशाचे असून त्यांनी यापूर्वी प्राईस वॉटर हाऊस कूपर्स कंपनीमध्ये 17 वर्षे इतकी सेवा बजावली होती. याआधी या पदावर झाचारी किर्खोण हे होते. ज्यांनी अलीकडेच राजीनामा दिला होता. सदरच्या नव्या सीएफओच्या घोषणेनंतर टेस्लाच्या समभागामध्ये 1 टक्का इतकी घसरण दिसून आली.









