11 वर्षांत प्रथमच घट : 2021-22 पेक्षा 8 टक्क्यांनी कमी
नवी दिल्ली
लहान बचत योजनांमधील गुंतवणूक 11 वर्षांत प्रथमच घटली आहे. यामध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), पीपीएफ, पोस्ट ऑफिस डिपॉझिट यासारख्या योजनांचा समावेश आहे. 2022-23 मध्ये या योजनांमध्ये 3.04 लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. यंदाची गुंतवणूक 2021-22 मधील 3.33 लाख कोटींच्या गुंतवणुकीपेक्षा 8.5 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आहे.
वित्त मंत्रालयाने जानेवारी-मार्च तिमाहीत या योजनांच्या व्याजदरात 1.10 टक्के वाढ केली होती. असे असतानाही गुंतवणूकदारांनी म्हणावा तसा प्रतिसाद नोंदवला नाही. बिहार, छत्तीसगड, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात लहान बचत योजनांच्या निव्वळ संकलनात वाढ झाली आहे. याचदरम्यान म्युच्युअल फंड, गोल्ड इटीएफ, इक्विटीमध्ये गुंतवणूक घटलीय.
जवळपास सर्व गुंतवणुकीत घसरण
म्युच्युअल फंड: आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या क्षेत्रात किरकोळ गुंतवणूकदाराची सरासरी गुंतवणूक 70,199 रुपये होती जी 2022-23 मध्ये 68,321 रुपयांवर आली आहे. म्हणजेच गुंतवणुकीत घसरण नोंदवली गेली आहे.
इक्विटी: एनएससीच्या एकूण उलाढालीमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 40.7 टक्क्यांवर गेला होता. तो आर्थिक वर्ष 202-23 मध्ये मात्र घसरत 36.5 टक्क्यांपर्यंत कमी झाला.
गोल्ड इटीएफ: आर्थिक वर्षात गोल्ड इटीएफमधील गुंतवणूक 74 टक्क्यांनी घटून 653 कोटी रुपये झाली. एक वर्षापूर्वी 2,541 कोटी रुपये होती.









