आगामी लोकसभा निवडणुकीबाबत घेतला आढावा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील सावंतवाडीत दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकी संदर्भात ते जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करीत आहेत. कार्यकर्त्यांकडून ते लोकसभा निवडणुकीबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती समजावून घेत आहेत . जिल्हाध्यक्ष इरशाद शेख ,माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, ज्येष्ठ नेते विकास सावंत, एडवोकेट दिलीप नार्वेकर ,नागेश मोरया गावडे ,विभावरी सुकी ,राजू मसुरकर, संदीप सुकी , सुधीर मल्हार, एडवोकेट राघवेंद्र नार्वेकर, दिलीप म्हापसेकर ,तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर जिल्हा महिला अध्यक्ष साक्षी वंजारी, समीर वंजारी तसेच असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.









