नवी दिल्ली
सरकारी गॅस कंपनी गेल इंडिया लिमिटेड यांनी आपला जून तिमाहीचा निकाल घोषित केला असून मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 51 टक्के नफ्यामध्ये घसरण नोंदवली आहे. 30 जून 2023 ला संपलेल्या तिमाहीमध्ये गेल इंडिया लि मिटेडला 1412 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. याआधीच्या वर्षात पाहता समान अवधीमध्ये 2915 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला होता. तिमाही आधारावर पाहायला गेल्यास कंपनीचा नफा 134 टक्के वाढला आहे.