Sweet Corn Recipe : पावसाळ्यात नाश्ता करताना नियमित काही ना काही चटपटीत खायची इच्छा होत असते. अशावेळी नियमित वेगळ काय बनवायचा असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. पोहे, उपमा, अप्पे, इडली, डोसा असे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही स्वीट कॉर्नचा उपमा ट्राय करा. या दिवसात बाजारात सगळीकडेच स्वीट कॉर्न पाहायला मिळतात. भाजलेले, उकडलेले स्वीट कॉर्न मीठ, तीखट आणि लिंबू पिळून गरमा-गरम तुम्ही खूपदा खाल्ले असेल. मग आता याचा उपमा करून बघा. यासाठी खूप साहित्यांची गरज नाही. अगदी घरातील साहित्यातच तुम्ही करू शकता. शिवाय टेस्टही खूप छान लागते. चला तर जाणून घेऊया रेसीपी
साहित्य
स्वीट कॉर्न-5
नारळाचे खोबरे-1 मध्यम आकाराचे
कोथंबीर- पाव कप
लिंबू-1
मीठ- चवीनुसार
फोडणीसाठी
तेल- 1 छोटा चमचा
मोहरी-पाव चमचा
जिरे- पाव चमचा
हिंग- पाव चमचा
कांदा-1
हिरव्या मिरच्या- 4
कडीपत्ता पाने -8 ते 10
हळद- पाव चमचा
कृती
मक्याची कणसे किसून घ्या. (किंवा सोलून मिक्सरला बारीक करून घ्या)त्यात कांदा, कोथंबीर, हिरव्या मिरच्या,कडीपत्ता घालून थोडे परतून घ्या. त्यामध्ये हळद, मीठ घालून किसलेली कणसे घालून मिक्स करा. कढईवर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट शिजू द्या. नंतर लिंबाचा रस, कोथबिंर, खवलेला नारळ, साखर घालून मिक्स करुन थोडेसे कोरडे होईपर्यंत शिजू द्या. सर्व्ह करताना वरुन कोथंबीर खोबरे भुरभुरा. झाला उपमा तयार. आता गरमा-गरम सर्व्ह करा.









