गडहिंग्लज प्रतिनिधी
गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौक आणि कासार गल्ली येथील दोन बंद घरे अज्ञात चोरट्याने सोमवारी रात्री फोडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, शिवाजी चौकातील काळभैरी मंदिरासमोरील सूर्यकांत कुलकर्णी यांचे घर बंद असताना बनावट चावीने कुलूप काढून घरात असणाऱ्या तिजोरीतील रोख ९ ते १० हजार रुपयांसह चांदीच्या वस्तूवर चोरट्याने डल्ला मारला आहे. तर कासार गल्ली येथील गणपती शिंदे यांच्या घराला देखील कुलूप असताना कुलूप तोडून घरातील पाच हजार रुपये रोख चोरल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात कुठेच सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात आडखळे येत आहेत.