वृत्तसंस्था/ बार्सिलोना
स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या हार्डकोर्टवरील टेनिस स्पर्धेत भारताच्या प्रार्थना ठोंबरेने दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. प्रार्थनाचे हे डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील दुसरे जेतेपद आहे. रविवारी झालेल्या महिला दुहेरीच्या सामन्यात महाराष्ट्राची 29 वर्षीय प्रार्थना ठोंबरे आणि तिची रशियन साथीदार टिकोनोव्हा यांनी फ्रांन्सच्या कॅसिनो व मर्सिनकोव्हिका यांचा अंतिम सामन्यात 3-6, 6-1, 10-7 असा पराभव केला. चालूवर्षीच्या टेनिस हंगामातील प्रार्थनाचे हे दुसरे विजेतेपद आहे. सां
गलीत वास्तव्य करणाऱ्या प्रार्थनाने गेल्यावर्षी जपानच्या मियासेकीसमवेत टेनिस स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद मिळविले होते.









