हातात बांधलेल्या बँडद्वरारे नियंत्रित होणार आजार, उंदरांवरील प्रयोग ठरला यशस्वी
स्वीत्झर्लंडच्या ईटीएच रिसर्च युनिव्हर्सिटीनुसार आरोग्यसंबंधी उपकरणे माहिती जमविण्यासोबत उपचार करण्यास सक्षम ठरू शकतात. परिधान करण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे म्हणजेच हातात बांधलेला फिटनेस बँड व्यक्तीच्या आरोग्याशी निगडित माहिती संकलित करणे आणि त्या आधारावर उपचार करण्यास वेगाने वाढती भूमिका बजावत असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

परंतु सध्या इलेक्ट्रॉनिक इंटरफेसच्या कमतरतेमुळे या उपकरणांना जीन-आधारित उपचारांसाठी थेट प्रोग्राम करता येत नाही. परंतु या समस्येवरही तोडगा निघाला आहे. या नव्या तंत्रज्ञानाला डार्ट (डायरेक्ट करंट एक्चुएटेड रेग्युलेशन टेक्नॉलॉजी) या नावाने ओळखले जाते.
हे तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे डिजिटल तंत्रज्ञान आणि जैविक शाखांच्या एनालॉग तंत्रज्ञानाला एकत्र आणते. माणूस जीन्सच्या एका निश्चित समुहासोबत जन्म घेत असतो. या जेनेटिक कोडमध्ये फारसा बदल होत नाही, परंतु वाढते वय आणि सवयींमध्ये बदल झाल्याने यात किंचित परिवर्तन घडू शकते. हार्ट काही बदलांना परत पूर्वीसारखे करू शकतो. या संशोधनादरम्यान संशोधकांना डायबिटिक उंदराच्या रक्तशर्करेला सामान्य स्तरापर्यंत आणण्यास यश मिळाले आहे. हे तंत्रज्ञान इन्सुलिनच्या उत्पादनाला थेट प्रोत्साहित करत मधुमेहाला नियंत्रित करण्यास मदत करू शकते. इन्सुलिनच्या निर्मितीसह या तंत्रज्ञानाला उर्वरित स्थितींना सामोरे जाण्यासाठी यात विकास अन् विस्तार केला जाऊ शकतो, असा संशोधकांना विश्वास आहे. या तंत्रज्ञानाद्वारे निर्धारित जीन्सना सक्रीय केले जाईल. यामुळे जेनेटिक्सशी निगडित अनेक प्रकारच्या स्थितींच्या उपचारात संभाव्य स्वरुपात मदत मिळू शकते.









