प्रतिनिधी,कोल्हापूर
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहकार व्यवस्थापन पदविका म्हणजेच डीसीएम पी-08 व सहकार व्यवस्थापन पदविका (बँकिंग) म्हणजेच पी-52 या अभ्यासक्रमांसाठी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे प्रवेशाची अंतिम मुदत 20 ऑगस्ट 2023 अशी आहे.ही माहिती या अभ्यासक्रमाच्या केंद्रसंयोजक प्रा. डॉ. रूपा शहा यांनी दिली.
डॉ. शहा यांनी पत्रकात म्हटले आहे की, मुक्त विद्यापीठाने या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश घेणे बंधनकारक केले आहे.प्रवेश घेताना अभ्यासकेंद्राचे नाव म्हणून दिलासा सामाजिक विश्वस्त संस्था, कोल्हापूर हे नाव नोंदवून अभ्यासकेंद्र क्रमांक 71256 असे अभ्यासकेंद्रासंदर्भातील रकान्यात नोंदवणे आवश्यक आहे.पी-08 अभ्यासक्रमासाठी पुस्तके,संस्था व परीक्षा शुल्कासह 4688 रुपये भरून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याबाबतची माहिती व फॉर्मची एक प्रत अभ्यासकेंद्रामध्ये आणून जमा करायची आहे. पी-52 या अभ्यासक्रमासाठी यावर्षीपासून शुल्क 2798 रूपये करण्यात आले आहे आणि ते ऑनलाईनच भरायचे आहे.
अधिक माहितीसाठी केंद्रसंयोजक, दिलासा सामाजिक विश्वस्त संस्था यांच्याशी संस्थेच्या पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांक 9422043399 वर संपर्क साधावा. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व राज्य सहकारी संस्था आयुक्त यांच्या आदेशानुसार सहकारी संस्थांमध्ये पदोन्नतीसाठी सहकार व्यवस्थापन पदविका आवश्यक ठरवलेली आहे. या पार्श्वभूमीवर नोकरी सांभाळून पूर्ण करता येईल असा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम हा सहकारी बँका व संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी एक वरदान ठरला आहे. केवळ सहा महिने कालावधीच्या या अभ्यासक्रमाचे वर्ग फक्त रविवारी घेण्यात येतात. कोणत्याही शाखेचा पदवीधर/ जी. डी. सी. अँड ए. किंवा बारावीनंतर तीन वर्षे आणि दहावीनंतर पाच वर्षे सहकारी संस्थेत कामाचा अनुभव ही पी-08 पदविका अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेली पात्रता आहे, तर पी-52 हा अभ्यासक्रम पी-08 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतो.