अॅड. रमाकांत खलप : सांखळीत श्रावणधारा साहित्य संमेलन उत्साहात : मान्यवरांचा सन्मान सोहळा
सुरेश बायेकर /सांखळी
गोमंतक भूमी ही अनेक महारथींनी नटलेली आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या गोव्यात आज साहित्याची वाटचाल अतिशय वेगाने सुरू आहे. गावागावात प्रतिभा ठासून भरलेली असून साहित्य संमेलनातून त्यांना व्यासपीठ प्राप्त होत असते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी केले. गोमंतकात वेगळ्या काही गोष्टी घडत असताना आपण राजकारण बाजूला ठेवून धार्मिक महत्त्व असलेल्या श्रावण महिन्यात नवोदित साहित्यिकांना प्रेरणा व ऊर्जा देण्यासाठी साहित्य संमेलन आयोजित करून नवी उमेद निर्माण केली आहे. मराठी उदयोन्मुख व नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी बिल्वदल परिवारातर्फे वे. घन:श्यामशास्त्री जावडेकर स्मृती सभागृह विठ्ठलापूर सांखळी येथे ’श्रावणधारा’ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन करून संमेलनास सुरवात करण्यात आली. संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उदघाटक डॉ. विनोद गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, प्रा कृष्णाजी कुलकर्णी, बिल्वदलचे अध्यक्ष सागर जावडेकर, म. कृ. पाटील, डॉ राजेंद्र साखरदांडे, सचिव कऊणा बाव्रे, गणेश वंदना गृहिमा पर्येकर यांनी सादर केली तर आसावरी भिडे यांनी ईशस्तवन सादर केले. सागर जावडेकर यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी आयोजनाचा हेतू विशद केला. यावेळी दिवंगत निसर्ग कवी ना. धो. महानोर यांना श्र्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ज. अ. रेडकर, यांच्या ‘नवतरंग तसेच प्रज्वलिता गाडगीळ यांच्या याला ‘जीवन ऐसे नाव’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यव रांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांचा सत्कार
यावेढी विविध मान्यवरांना गौरविण्यात आले. सुरेश वाळवे, रमेश वसकर, प्रकाश तळवडेकर, डॉ. मधू घोडकिरेकर यांचा स्मृती चिन्ह शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने सुरेश वाळवे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी ऐतिहासिक, भौगोलिक, संस्कृतिकदृष्ट्या गोवा भारतातील महत्वाचे राज्य आहे. गोव्याची खरी ओळख मासळी नाही तर येथील निसर्ग व धार्मिक संस्कृती असल्याचे सांगितले. गोव्यात हुशार साहित्यिक असून उत्तम साहित्य निर्माण करण्याची क्षमता येथील साहित्यकांत आहे, असे कौतुकोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ गायकवाड यांनी काढले. प्रा कृष्णाजी कुलकर्णी यांनी आज आपण प्रतिक्रिया शून्य होत चालल्याची खंत व्यक्त केली. लिहिते, बोलते, व व्यक्त होणे गरजेचे आहे. यासाठी युवापिढीने शदांशी मैत्री करणे आवश्यक आहे. जे उत्तम वाचन करतात त्यातून बुद्धीला चालना मिळते अभ्यासाने संशय दूर होतो. ज्यांच्याकडे रसिकता आहे, त्यांचे जीवन समृद्ध होते, असे प्रतादन प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी केले.
व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज : प्रा. कुलकर्णी
जगण्याच्या कोलाहलात आपला एक सुर शोधण्याचा प्रयत्न करा, व्यक्त होण्यास संकोच करू नका, असे आवाहन तऊण साहित्यकांना त्यांनी केले. उत्तम साहित्य लोकांच्या हातात देणे हे साक्षात्कारासारखे आहे. व्यक्त होण्यासाठी संमेलनाची गरज असून त्यात तऊणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होणे गरजेचे आहे लिहीत राहा तुम्हाला एक दिवस तुमचा स्वर गवसेल. त्यासाठी सर्वानी लिहित राहा, असाही मौलिक सल्ला प्रा. कुलकर्णी यांनी दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले तर कऊणा बाव्रे यांनी आभार मानले.
परिसंवादला चांगला प्रतिसाद
‘श्रावणात घन निळा बरसला’ या साहित्यकि परिसंवादाला चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी अध्यक्षस्थानी विनोद गायकवाड होते या परिसंवादात प्रा. श्र्रद्धा गवंडी, स्नेहा जोशी यांनी सहभाग घेतला होता.
नाट्या संवाद सादरीकरण’,
‘पर्यावरण जतन व माझे कर्तव्य’ या विषयावर युवकांसाठी परिसंवाद व चर्चा झाली. यामध्ये श्रुती हजारे, आसावरी भिडे, डॉ. रश्मिना आमोणकर सहभागी झाले होते.
कविसंमेलनात नवोदित साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांखळी येथील बिल्वदल परिवार आयोजित साहित्य संमेलनानिमित्त रविवारी विठ्ठलापूर येथे वे. घन:शाम शास्त्री जावडेकर सभागृहात ’श्रावणधारा’ कवी संमेलन झाले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. अनिता तिळवे व सहयोगी कालिका बापट उपस्थित होत्या. यावेळी शीला काकोडकर, पूर्णिमा देसाई, डॉ.नूतन देव, प्रा. अंजली चितळे, डॉ. नीता तोरणे, श्र्रद्धा गवंडी, श्र्रमी भौंसुले, राशी देसाई, लक्ष्मी महात्मे, निकिता शिरोडकर, तृप्ती बांदेकर, माधुरी शेटकर, नाईक, प्रज्वलिता गाडगीळ, कविता आमोणकर, संजय पाटील, धनश्री जाधव, अवंती कोटे, शिवानंद बाव्रे, पत्रकार सुरेश बायेकर, गौरीश नाईक, संजय फडते, दामोदर मळीक, विठ्ठल भगत, वर्षा गावकर, आसावरी भिडे, दर्शना परब, सचिन माणेरीकर आदी कवि, कवयित्रींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन एकापेक्षा एक अर्थपूर्ण अशा कविता सादर केल्या. डॉ. अनिता तिळवे यांनी कवितांचे समीक्षण आणि मार्गदर्शन केले.









