वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सप्टेंबर महिन्यात चीनमधील हेंगझोयु येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय चंमूतील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने हल्ला बोल लघुचित्र मालिका अंब्रेला मोहिमेच्या अंतर्गत ‘चियर इंडिया’ तयार केली आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी या लघुचित्र मालिकेचे अनावरण केले आहे.
अशाच धर्तीवर टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी ऑलिंपिक की आशा ही लघुचित्र मालिका तयार करण्यात आली होती. आता साईतर्फे हल्ला बोल लघुचित्र मालिकेतील 12 भाग येत्या कांही आठवड्यात प्रदर्शित केले जातील. आगामी आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि आत्मविश्वास देण्यासाठी देशातील युवापिढीला क्रीडा क्षेत्राचे आकर्षण निर्माण होण्याकरिता ही योजना साईतर्फे आखण्यात आली असल्याचे क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले.









