वृत्तसंस्था/ चित्तुर
तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या चित्तुर जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान दगडफेक अन् जाळपोळ केल्याप्रकरणी 50 जणांना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर दंगलीत सामील अन्य 200 लोकांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सध्या फुटेज पडताळून पाहत आरोपींची ओळख पटविली जात असल्याचे पोलिसांकडून शनिवारी सांगण्यात आले.
चंद्राबाबू नायडू यांच्या चित्तुर जिल्ह्यातील शुक्रवारच्या दौऱ्यादरम्यान दगडफेक अन् जाळपोळ झाल्याने 20 पोलिसांह तेदेप अन् वायएसआर काँग्रेसचे अनेक समर्थक जखमी झाले होते. आमच्याकडे व्हिडिओ फुटेज असून आम्ही आणखी 150-200 लोकांना ताब्यात घेणार आहोत. चित्तुर जिल्ह्dयात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक वाय. रिशांत रे•ाr यांनी दिली आहे.
महिलांसह पोलिसांवर दगड, बियरच्या बाटल्या अन् काठ्यांनी हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थिती आता नियंत्रणात असून कलम 144 लागू करण्याची गरज नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.









