अंदमान उपराज्यपालांना ठोठावला होता दंड : मुख्य सचिवांना केले निलंबित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंदमान आणि निकोबार बेटसमुहाच्या उपराज्यपालांवर 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय कलकत्ता उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांना निलंबित केले होते.
कलकत्ता उच्च न्यायालयाने सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्सशी संलग्न अंदमान सार्वजनिक बांधकाम विभागाला मजुरांना डीए लाभ देण्याचा आदेश दिला होता. या आदेशाचे पालन झाल्याने उच्च न्यायालयाने उपराज्यपाल तसेच मुख्य सचिवांना दंड ठोठावला होता. तसेच मुख्य सचिवांना निलंबित केले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने यापूर्वी 17 डिसेंबर रोजी आदेश दिला होता. या आदेशाचे पालन न झाल्यानेही दंड ठोठावण्यात आला होता.









