मुंबई :
एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी डाबर यांनी आपला आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील नफा जाहीर केला आहे. कंपनीने जूनअखेरच्या तिमाहीत 456 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत नफ्यात नाममात्र 3.5 टक्के इतकी वाढ झाली आहे. मागच्या खेपेला समानअवधीत 441 कोटी रुपयांचा नफा कंपनीला झाला होता. तर दुसरीकडे पहिल्या तिमाहीत 10 टक्के वाढीसह 3130 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करण्यात कंपनीने यश मिळवले आहे.









