कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपचे खासदार अराग ज्ञानेंद्र यांच्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट रोजी, अरगा ज्ञानेंद्र यांनी एका जाहीर कार्यक्रमादरम्यान बिदरमधील लोक कडक उन्हामुळे काळे झाले आहेत खर्गेंकडे पाहिले तर आपल्याला त्यांची अवस्था समजते असा टोला त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना उद्देशून लगावला होता.
एका जाहीर सभेला उद्देशून बोलताना ज्ञानेंद्र आरग म्हणाले कि, “बिदर प्रदेशातील लोक कडक उन्हात काळे दिसतात. उन्हामुळे ते जळलेले दिसतात त्यामुळेच ते रंगाने अधिक काळे आहेत. हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पाहून स्पष्ट होते. त्यांच्या डोक्यावरचा रंग थोडा वेगळा असल्याने ते उपस्थित असल्याचे वाटतात.” असे खळबळजक विधान त्यांनी केले होते.
काँग्रेसने ज्ञानेंद्र आरग यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. भाजप नेते आरग यांची ही टिप्पणी वंशद्वेषी असल्याचा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपुर्ण दलित समाजाचा अपमान झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे खासदार असलेले ज्ञानेंद्र आरग यांच्यावर बिदर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.









