डेगवेत बीएसएनएलची बॅटरी न बसवल्यामुळे नेटवर्क गूल
सावंतवाडी : प्रतिनिधी
बीएसएनएलची बॅटरी न बसवल्यामुळे १५ ऑगस्टला जाहीर उपोषण करण्याचा इशारा डेगवे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना विभाग प्रमुख विजय शंभा देसाई यांनी दिला आहे.डेगवे गावामध्ये 4 वर्षापूर्वी BSNL चा टाॅवर बसवलेला असुन गेली 2 वर्ष बॅटरी चोरीला गेलेली आहे. लाईट असली तरच रेंज येते नायतर रेंज येते नसल्या कारणाने याची वेळोवेळी सावंतवाडी BSNL ऑफिसला लेखी तोंडी निवेदन देऊन सुद्धा काही केलेले नाही. फक्त तोंडी आश्वासन दिली. १५ ऑगस्टपर्यंत बॅटरी न बसवल्यास १५ ऑगस्टला BSNL ऑफिस समोर उपोषणाला बसणार असे देसाई यांनी म्हटले आहे.









