वृत्तसंस्था /बेंगळूर
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या आयसीसी 2023 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी नेदरलँड्सचा संघ पूर्वतयारीसाठी सप्टेंबरच्या प्रारंभी भारतात दाखल होणार आहे. नेदरलँड्स संघाच्या सराव सामन्यांबाबतचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. नेदरलँड्सचा संघ सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात दाखल होईल. भारतात दाखल झाल्यानंतर नेदरलँड्सचा संघ सरावासाठी काही सामने खेळणार आहे. हे सामने बेंगळूरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते. या सराव सामन्यानंतर नेदरलँडस्चा संघ हैदराबाद किंवा थिरुवनंतपूरम येथे अधिकृत सरावाचे सामने खेळण्यासाठी दाखल होईल. 2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड्स संघाचा सलामीचा समना पाकिस्तानबरोबर 6 ऑक्टोबरला राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर पुढील सामना 9 ऑक्टोबरला राजीव गांधी स्टेडियममध्ये न्यूझीलंडबरोबर खेळवला जाईल. नेदरलँड्सचा संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाचव्यांदा आपला सहभाग दर्शवित आहे. 2011 नंतर नदेंरलँड्सचे हे या स्पर्धेतील पहिलेच आगमन आहे.









