अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी सनी देओलच्या ‘गदर 2’सोबत प्रदर्शित होणार आहे. ओह माय गॉड 2 या चित्रपटात पंकज त्रिपाठी, यामी गौतम धर आणि अरुण गोविल हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची कहाणी अमित राय यांनी लिहिली असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित ‘ओह माय गॉड’चा सीक्वेल आहे. ओएमजी 2 हा चित्रपट शिवभक्त कांति शरण मुदगल या व्यक्तिरेखेची कहाणी दर्शविणार आहे. सर्वसामान्य व्यक्ती, प्रेमळ पिता आणि देखभाल करणार पती अशी ही मध्यवर्ती भूमिका आहे. या व्यक्तिरेखेच्या मुलाला अनैतिक वर्तनाच्या आरोप करत शाळेतून काढले टाकले जात असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. कांती ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा अशा स्थितीत कुटुंबासमवेत शहर सोडण्याचा निर्णय घेते, परंतु त्याला भगवान शिव योग्य मार्ग दाखवित असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. पूर्वी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होता. जियो सिनेमा अॅपसोबत निर्मात्यांनी 90 कोटी रुपयांचा करार करण्याची तयारी चालविली होती. परंतु अखेरच्या क्षणी निर्मात्यांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Previous Article‘गोदरेज’च्या नफ्यामध्ये तीनपट वाढ
Next Article दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत संमत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









